बाबासाहेबांनी समाजव्यवस्थे विरोधात लढा देऊन दीन-दुबळ्यांना जगण्याचा हक्क मिळवून -एन.एम. पवळे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, उपसचिव निवृत्ती आरु, विजय भांबळ आदी उपस्थित होते.
एन.एम. पवळे म्हणाले की, दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ. बाबासाहेबांनी कार्य केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना अस्तित्वात आली. प्रचंड संघर्षशील परिस्थितीतही बाबासाहेबांनी समाजव्यवस्थे विरोधात लढा देऊन दीन-दुबळ्यांना जगण्याचा हक्क मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
