महात्मा फुले व बाबासाहेबांच्या प्रतिमा आणि पुतळ्यावर पुष्पवृष्टी
फुले, आंबेडकरांनी समाजाच्या उध्दारासाठी शिक्षणाचा मंत्र देवून समतेची रुजवण केली -संजय सपकाळ
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तपणे उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी भगवान गौतम बुध्दांच्या पुतळ्यासमोर त्रीशरण व पंचशील घेण्यात आले. हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी संजय भिंगारदिवे, सचिन चोपडा, अरविंद्र ब्राम्हणे, विकास भिंगारदिवे, सुरेखा आमले, कविता भिंगारदिवे, कांताबाई स्वामी, रिया भिंगारदिवे, सुमेश केदारे, सचिन चोपडा, रमेश वराडे, माधव भांबुरकर, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, अशोक पराते, दीपक बडदे, सुंदरराव पाटील, सुधीर कपाले, जालिंदर बेल्हेकर, विठ्ठल राहिंज, संतोष हजारे, विनोद खोत, रतनशेठ मेहेत्रे, अशोक लोंढे, नामदेव जावळे, साहिल चोपडा, सिताराम परदेशी, अविनाश पोतदार, किशोर भगवाने, रामनाथ गर्जे, ह.भ.प. अनावडे महाराज, विनोद खोत, अशोक भगवाने, मुन्ना वाघस्कर, प्रशांत भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, अनिलराव सोळसे, अविनाश जाधव, श्रीरंग देवकुळे, रमेश कोठारी, शिरीष पोटे, प्रकाश देवळालीकर, जालिंदर आळकुटे, कुमार धतुरे, किरण फुलारी, राजू कांबळे, नवनाथ वेताळ, शेषराव पालवे, नवनाथ खराडे, दत्तात्रय लाहुंडे, योगेश चौधरी, अनिल ताठे, सुनील कसबे, विकास निमसे, अजय खंडागळे, संदीप नायडू, संदीप छजलानी, राम झिंजे, सचिन कस्तुरे, अभि मुथा, सिद्धार्थ दीक्षित, राजू शेख आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्व व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यास समाजाचा खरा विकास साधला जाणार आहे. त्यांच्या विचाराने शेवटच्या घटकांना दिशा मिळणार असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविल्यास त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे. महात्मा फुले व बाबासाहेब या दोन्ही गुरु-शिष्यांनी समाजाच्या उध्दारासाठी शिक्षणाचा मंत्र देवून समतेची रुजवण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संजय भिंगारदिवे, सचिन चोपडा, अरविंद्र ब्राम्हणे, विकास भिंगारदिवे यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
