घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्य नियोजनाची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. या भेटीत ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर व जिल्ह्यात घरकुल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य नियोजन करण्याबाबत गणेश बनकर यांनी ग्रामविकासमंत्री यांचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, भाजप सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि ओबीसी समाजातील कुटुंबांना स्वतःच्या घराचा हक्क मिळावा यासाठी घरकुल योजना राबविण्यात आलेली आहे. घरकुल योजना ही केवळ शासकीय योजना नसून, गरीबांच्या स्वप्नातील घराची पूर्तता करणारी योजना आहे. या योजनेद्वारे सर्वसामान्यांचे स्वप्न साकारण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना करुन नियोजनाची मागणी त्यांनी ग्रामविकासमंत्र्यांकडे केली.
