अहमदनगर (प्रतिनिधी)- ओबीसी समाजासाठी राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचे काम करण्यात आलेले असल्याने ओबीसी समाजाने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीच्या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी अनेक योजना राबविल्या. त्यामध्ये प्रामुख्याने विश्वकर्मा योजना असून, या योजनेतंर्गत 1 ते 3 लाखापर्यंत विनातारण कर्जपुरवठा उपलब्ध होवून गोरगरीब युवकांना उद्योग, व्यवसायासाठी भांडवल मिळाला आहे. ओबीसी घरकुल योजनेद्वारे अनेक वर्षापासून वंचित असलेल्या दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात आले आहे. बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या फुले दांम्पत्यांनी सुरु केलेली मुलींची पहिली शाळा भिडेवाडा या वास्तूला राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जा देऊन पुनर्विकासासाठी सुमारे 90 कोटी रुपये निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करुन समाज व देशाचा विकास साधण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणावे लागणार आहे. नगर दक्षिण मधून महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून अनेक विकास कामे मार्गी लावली आहे. त्यांना पुन्हा संधी मिळाल्यास ते आनखी जोमाने विकासाला चालना देणार असल्याचे बनकर यांनी म्हंटले आहे.
