• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

ओबीसी बहुजन पक्षाच्या उमेदवाराला शहरातील ओबीसी समाजाचा पाठिंबा

ByMirror

Apr 21, 2024

ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरुन खदखद असताना त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसत आहे. नुकतीच शहरात ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यामध्ये ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेले नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार दिलीप कोंडिबा खेडकर यांना पाठिंबा देण्यात आला.


दिलीप कोंडिबा खेडकर हे निवृत्त आयएस अधिकारी असून, त्यांच्या माध्यमातून एक सक्षम व सुशिक्षित उमेदवार पर्याय म्हणून नागरिकांना मिळाला आहे. प्रशासनातील माजी अधिकारी असलेले खेडकर यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *