• Mon. Jul 21st, 2025

नोटरी पब्लिकपदी ॲड. सविता बोठे पाटील

ByMirror

Mar 16, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील सविता बोठे पाटील यांची नोटरी पब्लिकपदी निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या विधी व न्याय खात्याने नुकतीच नोटरी नियुक्तीची यादी जाहीर केली. त्याद्वारे भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यात नोटरीपदी ॲड. बोठे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.


शिक्षणाची प्रंचड ओढ असलेल्या बोठे पाटील यांनी शहरातील न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर मधून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले व बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (बीएएमयू), औरंगाबाद येथून कायद्यामधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून एलएलएम ही पदवी प्राप्त केली. त्यांनी 2 विषयात एमए, डीफार्म व एमफिल अशा अनेक पदव्याही संपादन केल्या आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब गोरे यांच्या त्या कन्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *