कौटुंबिक न्यायालयात नवनियुक्त नोटरीपदी नियुक्ती झालेल्या वकिलांचा गौरव
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत नोटरी पब्लिक यांनी काम करावे. समाजातील गोरगरीब वंचित घटकांना विविध न्यायालयाच्या कामकाजासाठी लागणारे दस्तऐवज, पडताळणी, करारनामा, प्रतिज्ञापत्र याची गरज असते. ती जबाबदारी प्रामाणिकपणे करून सत्यता पडताळून कार्य करावे. नोटरीचा उपयोग समाजातील सर्व घटकांना व्हावा असे प्रतिपादन जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता भालेराव यांनी केले.
कौटुंबिक न्यायालय वकील संघ अहमदनगरच्या वतीने अहमदनगर बार असोसिएशनचे व कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे सदस्य यांची भारत सरकारने नोटरी पब्लिक पदी निवड केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा कौटुंबिक न्यायालयात झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी न्यायाधीश भालेराव बोलत होत्या. याप्रसंगी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, कार्याध्यक्ष ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. अनिता दिघे, ॲड. राजेश कावरे, ॲड. शिवाजी सांगळे, समुपदेशक राठोड मॅडम, ॲड. अनिल सरोदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ॲड. सुरेश लगड म्हणाले की, वकिली व्यवसाय करताना प्रामाणिकपणा, सचोटी, अद्यावत अभ्यास, वरिष्ठ न्यायालयाच्या निर्णयांचे संदर्भ घेऊन पक्षकाराला न्याय मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला तर निश्चितच पक्षकाराला न्याय मिळतो. त्याचबरोबर नोटरी ही अतिरिक्त जबाबदारी घेऊन न्यायप्रक्रियात सहभागाची संधी भारत सरकारने दिलेली आहे. त्याचा उपयोग सर्वसामान्यांना होईल, यादृष्टीने कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
ॲड.शिवाजी कराळे यांनी वकील बांधवांनी केलेल्या प्रयत्नांना नोटरीच्या रूपाने समाजात कार्य करण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येकाने परिश्रमपूर्वक अभ्यास करून वकील व्यवसाय सांभाळून हे पद आपल्या कर्तुत्वाने मेरिट वर मिळवले आहे. अहमदनगर मधील अनेक सन्माननीय वकील आज न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, सरकारी वकील अशा विविध मोठ्या पदावर उत्तम कार्य करीत आहे. अहमदनगर बारची उज्वल परंपरा असून, नोटरी पदाच्या माध्यमातून देखील आदर्शवत कार्य वकील बांधवांनी करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी न्यायाधीश संगीता भालेराव यांच्या हस्ते नवनियुक्त नोटरी पब्लिक ॲड. महेश शिंदे, ॲड. अनिता दिघे, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. राजेश कावरे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. गणेश पाटील, ॲड. राजेंद्र सेलोत, ॲड. संदीप पाखरे, ॲड. अनिल सरोदे, ॲड. भाऊसाहेब पालवे, ॲड. प्रमोद जेटला, ॲड. प्रणव आपटे, ॲड. श्रीकांत गवळी, ॲड. मनिषा केळगंद्रे, ॲड. अनघा भारदे, ॲड. भासाहेब राहिंज, ॲड. मिना शुक्रे, ॲड. चेतन रोहोकले, ॲड. मनीष पंडुरे, ॲड. भगवान कुंभकर्ण, ॲड. विकास सांगळे, ॲड. चंद्रकांत निकम, ॲड. रवींद्र चौधरी, ॲड. अमोल धोंडे, ॲड. प्रभाकर शिरसाठ, ॲड. प्रभाकर शहाणे, ॲड. नितीन डुबे पाटील, ॲड. सुरज खंडीझोड, ॲड. सुशीला चौधरी, ॲड. राजेंद्र देवळालीकर आदींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सांगळे व ॲड. राजेश कावरे यांनी केले. आभार ॲड. अनिता दिघे यांनी मानले.