गुणवंत मुलींचे डोंगरे संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर वाचनालयाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ विद्यालयातील मुलींनी एनएमएमएस स्कॉलरशीप परीक्षेत यश संपादन केले. या विद्यार्थिनींचा सत्कार स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अमोल वाबळे, डॉ. संकेत जपकर, अतुल फलके, आदिती तरटे, प्रणव कापसे, निशांत फलके, गणेश जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे आदी उपस्थित होते.
एनएमएमएस परीक्षेत हेमलता बोडखे, श्वेतांजली कार्ले, सिध्दी कापसे, मोहिनी वाघुले, आकांक्षा गायकवाड या विद्यार्थिनींनी एनएमएमएस स्कॉलरशीप परीक्षेत यश संपादन केले आहे. तर या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे शिक्षक अमोल वाबळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयासह गावाचा नावलौकिक वाढविला आहे. प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे जात असून, मुलींनी मिळवलेले यश गावाच्या दृष्टीने भुषणावह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.