सोसायटी ही शेतकऱ्यांची कामधेनू, गावाच्या विकासाची आधारस्तं -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन अतुल फलके व व्हाईस चेअरमन संजय डोंगरे यांचा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले. या प्रसंगी अंबादास दूध डेअरीचे चेअरमन भाऊसाहेब जाधव, वैभव पवार, किरण ठाणगे, नवनाथ होले, मेजर शिवाजी पुंड, पोपट भगत, राजेंद्र शिंदे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, उत्तम निमसे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सोसायटी ही शेतकऱ्यांची खरी कामधेनू आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करून त्यांना स्वावलंबी बनविण्यात सहकारी चळवळीचे मोलाचे योगदान आहे. या सोसायटीतून गावाचा विकास साधण्यासाठी अनेक योजना राबविता येतात. शेतकऱ्यांचा विकास झाला तर गाव आपोआप प्रगतिपथावर जाईल. चेअरमन अतुल फलके व व्हाईस चेअरमन संजय डोंगरे यांच्याकडे विकासाची दृष्टी असून, त्यांच्या नेतृत्वामुळे सोसायटीचे कार्य अधिक पारदर्शक व शेतकरीहिताचे होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
