भारतीय जनता पक्षाची ताकद म्हणजे तिचे समर्पित कार्यकर्ते -दत्ता गाडळकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या सहचिटणीसपदी कुंडलिकजी गदादे व युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी यश संतोष शर्मा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी
भाजपचे दत्ता गाडळकर, विशाल खैरे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
दत्ता गाडळकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची ताकद म्हणजे तिचे समर्पित कार्यकर्ते. संघटनाला बळकटी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता स्वत:ला झोकून कार्य करत आहे. कुंडलिक गदादे आणि यश शर्मा यांनी पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवर पक्षाला नवी ऊर्जा मिळणार आहे. राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून समाजसेवेचा मार्ग आहे. ओबीसी समाजातील प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कार्य करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गदादे व शर्मा यांनी स्थानिक पातळीवर काम करताना सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन एकजुटीने पक्ष वाढीचे कार्य केले जाणार असून, विविध प्रश्न भाजपच्या माध्यमातून सोडविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.