• Sun. Feb 15th, 2026

मेहेरबाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ निघालेल्या नवजीवन पदयात्रेचे शहरात स्वागत

ByMirror

Oct 17, 2024

लाल बावटा संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने भाविकांना फळांचे वाटप

नगर (प्रतिनिधी)- समर्पण, आत्मत्याग व मानवतेच्या सेवेचा संदेश देणाऱ्या अवतार मेहेरबाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ 75 व्या नवजीवन पर्वाच्या स्मरणार्थ नवजीवन पदयात्रा काढण्यात आली. अवतार मेहेरबाबा अहमदनगर केंद्राच्या वतीने काढण्यात आलेल्या या नवजीवन पदयात्रेचे शहरात लाल बावटा संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने स्वागत करुन भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले.


चाणक्य चौकात यात्रेचे उत्साहात स्वागत करुन घोड्यांच्या रथामध्ये असलेल्या अवतार मेहेरबाबांच्या प्रतिमेस भाकपचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे व लाल बावटाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, सुभाष शिंदे, हरिष पाटोळे, तुषार शेलार, अजित बोराटे, सुनिता जावळे, अशोक दळवी, राम कल्हापुरे आदींसह युनियनचे सदस्य उपस्थित होते.


संस्थेचे विश्‍वस्त मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले व राजू प्रसाद यांनी कामगार युनियनच्या वतीने दरवर्षी करण्यात येणाऱ्या यात्रेच्या स्वागत उपक्रमाचे कौतुक केले. अवतार मेहेरबाबांनी 16 ऑक्टोबर 1949 रोजी नवजीवन यात्रेला प्रारंभ केला होता. या घटनेच्या 75 व्या वर्षाच्या स्मृतीप्रित्यर्थ सरोष टॉकीज येथील मेहेर सेंटर येथून या पदयात्रेचा प्रारंभ झाला. सदर पदयात्रा अरणगाव मेहेराबाद येथे मेहेरबाबांच्या समाधी स्थळी समारोप झाला. यामध्ये मोठ्या संख्येने जिल्ह्यासह परदेशातील भाविक मेहेरबाबांचा जयघोष करीत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *