• Sat. Feb 8th, 2025

शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा; देशभरातून 987 विद्यार्थ्यांचा सहभाग

ByMirror

Jan 21, 2025

झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन

स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण काळाची गरज -दिनकर टेमकर

नगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 987 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली.
शहरातील नगर-कल्याण महामार्गावरील सुखकर्ता लॉन येथे पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून, अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले. झटपट गणित सोडविण्याची परीक्षा यावेळी रंगली होती.


या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. टेमकर म्हणाले की, स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण ही काळाजी गरज आहे. शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा गणित हा विषय सोपा करण्यासाठी त्यांना अबॅकस शिक्षण फायद्याचे ठरते. देशभरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमी विद्यार्थ्यांना देत असलेल्या अबॅकस व वैदिक गणिताच्या शिक्षणाबद्दल कौतुक केले.


या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले सुजय थोरात, वेदिका ठोकळ, समृध्दी जगताप व नैवेद्य गुणवंत या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आराध्या गवते, कार्तीक इंगळे, धनुष राऊत, प्रिया शेळके, संस्कृती पाटील, संस्कृती गावडे, मेघराज तांबे, सुजय थोरात, वेदिका ठोकळ, समृध्दी जगताप, मिताली जगताप, शिवराज मोरे, ओम पवार, आरुष होले, वेदांत गोरे, आराध्या मते, श्रेया रकटाटे, श्‍लोक कासार, आकांक्षा महांडुळे, ईशिका शिंदे, नैवेद्य गुणवंत, प्रांजली पवार, रिध्दी कासार, शर्विल पवार, आरोही राऊत या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.


अकॅडमीत उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या वंदना वाळके, अश्‍विनी रकटाटे या शिक्षिकांना टू स्टार अवार्ड, कोमल कर्डुळे, सोमनाथ बोचरे यांना स्टार टिचर अवार्ड, तर हिना शेख, जयमाला भाकरे, किर्ती देशमुख, पल्लवी तांबट, प्रियंका शिरसाठ व मोनिका तांबे या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळभाऊ रकटाटे, श्रीगोंदा माजी कृषी अधिकारी बलभिम शेळके, अर्थ व बांधकाम विभागाचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, कराड येथील उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, नगर जि. प. माध्य. शिक्षण विभाग अधिक्षक महावीर धोदाड, आष्टी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सीमाताई काळे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडळे, गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष मगर, महाराष्ट्र राज्य पोस्टल संघटना अध्यक्ष संतोष यादव, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आशाताई निंबाळकर, विद्याताई यादव, छायाताई मगर, जयसिंग कारखिले, शरद वाळके, गर्जेंद्र राठोड, संदीप डावरे, ज्योतीताई सुपारे, महादेव भद्रे, कमलेश मिरगणे, गौतम पठारे, श्रीलता आडेप, रंजनाताई उकीरडे, सुषमाताई पडोळे, साधनाताई बोरुडे, आशाताई गायकवाड, सुनिल पावसे, आनंद गिरवले, अजिंक्य हंकारे, अजय पायाळ, विद्या यादव, महेश वारे, प्रा. सुनिल शेंडगे, नितीन कर्डुळे, सितारात सारंग, नामदेव रकटाटे, नामदेव पाटील वाळके, नितीन पठारे, श्रीराम शेळके आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रविंद्र रकटाटे, जय शेळके, श्रीतेज रकटाटे व सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अकॅडमी व स्पर्धेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *