आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल झाला सन्मान
सोसायटीच्या वतीने मिळालेल्या मान-सन्मानाने आनखी सामाजिक कार्य करण्यास बळ मिळाले -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने संस्थेचे सभासद तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शिक्षण भवन येथे पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राचार्य विजयकुमार पोकळे, मनोज शिंदे, संस्थेचे अध्यक्ष दिलीप काटे, उपाध्यक्ष संजय कोळसे, सचिव स्वप्निल इथापे, तज्ञ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, संचालक आप्पासाहेब शिंदे, काकासाहेब घुले, चांगदेव खेमनर, ज्ञानेश्वर काळे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सुर्यकांत डावखर आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सातत्याने जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीने सभासद व त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. गेल्या 20 वर्षात सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक कार्यात योगदान देताना मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल व मला देखील मिळालेल्या पुरस्काराबद्दल वेळोवेळी सत्कार करुन प्रोत्साहन दिले. माध्यमिक सोसायटी हा एक परिवार बनला असून, सर्व सभासदांच्या सुख, दु:खात सहभागी होत आहे. वेळोवेळी सोसायटीच्या वतीने मिळालेल्या मान-सन्मानाने आनखी सामाजिक कार्य करण्यास बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष दिलीप काटे व तज्ञ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
नुकतेच डोंगरे यांना नाशिक येथे भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने व स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, माजी मुख्याध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, तुकाराम खळदकर आदींसह शिक्षक सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.