जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाची मुले घडविली -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी रोहिदास भुजबळ-शिंदे यांची माध्यमिक शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळाली. पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी सत्कार केला. याप्रसंगी मयुर काळे, रोहिदास भुजबळ, राजेश भुजबळ, ओंकार भुजबळ आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, निमगाव वाघा येथे जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाची मुलांना शिक्षणातून घडविण्याचे कार्य नलिनी भुजबळ-शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करुन शैक्षणिक गुणवत्तेने त्यांनी बदल घडवून आणला. त्यांना मिळालेली पदोन्नती ही त्यांच्या कार्याचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. नलिनी भुजबळ-शिंदे यांनी ग्रामस्थांची साथ मिळाल्याने चांगल्या पध्दतीने काम करता आले. डोंगरे संस्थेने नेहमीच शैक्षणिक कार्याला पाठबळ देऊन वेळोवेळी सहकार्य केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.