सोमवार व मंगळवारी रंगणार मुला-मुलींच्या कुस्तीचा थरार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाच्या मैदानात सोमवार व मंगळवारी (दि.11 व 12 सप्टेंबर) रंगणार आहे. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, नगर तालुक्यातील शालेय कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा नगर तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी केले आहे.
नगर तालुका शालेय विविध क्रीडा स्पर्धा होत असून, ही कुस्ती स्पर्धा जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नगर तालुका क्रीडा समितीच्या माध्यमातून होत आहे. नगर तालुक्यातील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेचे शुभारंभ होणार आहे. सदर स्पर्धा 14, 17, 19 वर्ष वयोगटात मुला-मुलींच्या वजनगटाप्रमाणे होणार असून, सोमवारी मुलांचे व मंगळवारी मुलींच्या कुस्त्यांचे सामने रंगणार आहे.
सर्वाधिक विजयी झालेल्या कुस्तीपटूंच्या शाळेला जनरल चॅम्पियनशीप देवून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगर तालुका क्रीडा समिती प्रयत्नशील असून, स्पर्धेसाठी नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, नवनाथ विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
