• Mon. Nov 3rd, 2025

भाजप महिला मोर्चाच्या वतीने शहरात माती पूजन करुन अमृत कलश सज्ज

ByMirror

Sep 15, 2023

माझी माती, माझा देश अभियानातंर्गत देशभक्त शूर वीरांच्या स्मृतींना उजाळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-कल्याण महामार्गावरील शिवाजी नगर येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने माझी माती, माझा देश अभियानातंर्गत माझी माती, माझा देश अभियानातंर्गत मातीचे पूजन करुन अमृत कलश सज्ज करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला असून, हा अमृत कलश दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे.


स्वातंत्र्य सैनिक व वीर जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ माझी माती, माझा देश उपक्रम सुरु आहे. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. भारत माता की जय…, वंदे मातरम… च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. भाजप महिला मोर्चाच्या मध्य मंडळ अध्यक्षा सविता प्रकाश कोटा यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस छायाताई देवांग, नाशिक चिटणीस रेखाताई लिंगायत, प्रदेश चिटणीस गीता गिल्डा, महिला मोर्चा संयोजक सुजाता औटी, प्रिया जानवे, ज्योती दांडगे, रेणुका करंदीकर, नीता देवरिकर, संध्या पावसे, सुशीला विश्‍वकर्मा, रोहिणी कोडम, नंदनी विश्‍वकर्मा, जयश्री क्यातम, शोभा पेद्राम, संगीता क्यातम, विजया म्याना, रेणुका न्यालपेल्ली, सारिका जंगम, निकिता सुरम, सुनिता न्यालपेल्ली, अनिता शिंदे, मुक्ता चोथे, कोमल सांगळे, अनिता पवार, तूम्मा ताई, अंजली श्रीगादी, जयाबाई सांगळे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


या कार्यक्रमात स्वातंत्र्यासाठी व देशासाठी बलिदान दिलेले देशभक्त शूर वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. छायाताई देवांग यांनी देशासाठी बलिदान दिलेल्यांचे ऋण न फेडता येणारे आहे. त्यांच्या स्मरणाने देश कार्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे स्पष्ट केले.


सविता कोटा म्हणाल्या की, देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृती स्फुर्ती व प्रेरणादायी आहे. या वीरांच्या स्मृतीला नमन करुन सक्षम भारत उभा राहत आहे. सिमेवर जीवाची बाजी लावून देश सेवा करणारे जवान खरे हिरो असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून देशसेवेसाठी प्रेरणा घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *