शहरातील कराचीवालानगरच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन
अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला रस्ता चकाकणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासाला चालना देवून पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्याचे कार्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. निधी उपलब्ध करुन प्रभागातील विविध विकासात्मक कामे पाठपुराव्याने मार्गी लावण्यात आल्याची भावना नगरसेविका अश्विनी सचिन जाधव यांनी व्यक्त केली.
शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील कराचीवाला नगर येथील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभाप्रसंगी नगरसेविका अश्विनी जाधव बोलत होत्या. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून व प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्याने मार्गी लावण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी भाऊसाहेब उनवणे, प्रकाश खंडेलवाल, प्रकाश पोखरणा, निलेश चोपडा, राहुल झंवर, भूषण बिहाणी, लक्ष्मीकांत झंवर, योगेश परदेशी, ॲड. आरिफ शेख, राजू डागा, रजत दायमा, कल्पेश इंदानी, योगेश बजाज, हर्षल जोशी, महेश बोरा, धीरज डागा, पुष्पा दायमा, मथुराबाई खंडेलवाल, विजय लढ्ढा आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पुढे जाधव म्हणाल्या की, नागरिकांना दिलेला शब्द पाळून प्रभागातील विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली आहे. कराचीवाला नगर येथे मोठी लोकवस्ती असल्याने खराब रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. सचिन जाधव यांनी विशेष प्रयत्न करुन सदरचे काम मार्गी लावले आहे. नागरिकांनी टाकलेला विश्वासाला तडा जाऊ न देता, सातत्याने त्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे काम सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुष्पा दायमा म्हणाल्या की, अनेक वर्षापासून कराचीवाला नगरचा मुख्य रस्त्याचे काम प्रलंबीत होते. या रस्त्याचे प्रश्न मार्गी लागल्याने या परिसरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे. नागरिकांना घरा पर्यंत जाण्यासाठी चांगले व दर्जेदार रस्ते उपलब्ध होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. प्रलंबीत रस्त्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल जाधव व उनवणे यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. लक्ष्मीकांत झंवर यांनी आभार मानले.
