• Thu. Oct 30th, 2025

मतदार जागृतीसाठी शहरात मोटार सायकल रॅली

ByMirror

Oct 25, 2024

शिक्षिका व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग

नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणुक विभाग यांच्या निर्देशानूसार नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेहेर इंग्लिश स्कूल, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व साई श्रध्दा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मोटार सायकल रॅली काढून मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.


पटवर्धन चौक येथील मेहेर इंग्लिश स्कूल येथून मोटार सायकल रॅलीचे प्रारंभ करण्यात आले होते. यामध्ये शालेय शिक्षिकांनी सहभागी होऊन नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. प्रारंभी शाळेत शिक्षकांनी उपस्थित युवक-युवती व विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगून, आपल्या कुटुंबातील सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या अनुरिता झगडे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, साई श्रध्दा फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परकाळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सत्यश्री चिलका, उषा भालेराव, गिता वल्लाकट्टी, शितल दळवी, मोहिनी नराल, आशा घोरपडे, देविका छजलानी, पुष्पा चक्रनारायण, राजश्री बिडकर, समीना शेख, विनिता पटवेकर, आयमन बागवान, मोनिका बामडाले, भारती खांडेकर, पूजा श्रीपत, सोनाली पवार, सृष्टी जोशी, गायत्री भंडारे, सारिका शिदोरे, रितू सोनवणे, गायत्री भुस्सा आदी उपस्थित होत्या.


या अभियानात मतदार यादीत नांव समाविष्ट करणे व मतदान करण्याबातची मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तर नाव मतदार यादीत नोंदवणे, नाव दुरुस्ती आदी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सदृढ लोकशाहीसाठी व चांगले उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्‍यक आहे. चांगले उमेदवार निवडून आल्यास विकास कामे होऊन विकास साधला जाणार आहे. मतदानाची कमी असलेल्या टक्केवारीतून योग्य व जनमतामधून उमेदवार निवडला जात नाही. यासाठी प्रत्येकाने कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजाविण्याचे त्यांनी सांगितले.


प्राचार्या अनुरिता झगडे म्हणाल्या की, कुटुंबाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांनी सर्व कुटुंबातील व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केल्यास मतदानाची टक्केवारी निश्‍चित वाढणार आहे. प्रत्येकाने मतदानाचे महत्त्व समजून योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणे, ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. या लोकशाहीत आपला सहभाग मतदानाच्या रुपाने प्रत्येक व्यक्तीने घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला, उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणुक अधिकारी राहुल पाटील, प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *