• Thu. Oct 16th, 2025

निमगाव वाघात मोहरम विसर्जन मिरवणूक व आषाढी एकादशीची पूजा उत्साहात

ByMirror

Jul 18, 2024

गावातील धार्मिक कार्यक्रमातून एकात्मतेचे दर्शन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे मोहरमनिमित्त ताजिया व सवारी विसर्जन मिरवणूक बुधवारी (दि.17 जुलै) उत्साहात पार पडली. तर आषाढी एकादशीनिमित्त गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली. गावात पार पडलेल्या मोहरम उत्सव व आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम भाविकांनी सहभागी होऊन धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडविले.


गावातून पारंपारिक वाद्यांसह निघालेल्या ताजिया विसर्जन मिरवणुकिचे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, नवाब शेख, बन्सी शेख, आदम शेख, इस्माईल शेख, दिलावर शेख, नासिर शेख, नुरमोहंमद शेख, अब्दुल शेख, मोईन शेख, अकबर शेख, फिरोज शेख, असिफ शेख, हबीब शेख, अन्सार शेख, अजहर सय्यद, बख्तार सय्यद, हुसेन शेख, सादिक शेख, आमन शेख आदींसह समाजबांधव उपस्थित होते.


शनिवारी सकाळी निघालेली ही मिरवणूक संध्याकाळ पर्यंत पारंपारिक वाद्यांच्या गजरात सुरु होती. गावात ठिकठिकाणी ताजिया व सवारीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या हसन-हुसेनच्या निनादात भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. मुस्लिम समाजाच्या वतीने गावात नऊ दिवस मजलिस व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सवारी गुलाब शेख यांनी उचलली होती.


आषाढी एकादशीनिमित्त गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी स्मिता फलके, शशीकला केदार, संजय कापसे, विजय जाधव, सचिन जाधव, वैशाली फलके, राजू भगत, जालिंदर आतकर, अतुल फलके, अनिता रासकर, माधुरी कापसे, विमल रासकर, बापू फलके, ओम आतकर, मच्छिंद्र गायकवाड, संदिप डोंगरे, भाऊसाहेब आनंदकर, जालिंदर आतकर, गुलाब केदार, शारदा शिंदे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार रविंद्र डावखर व पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदिश जंबे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *