श्री विशाल गणेशाच्या कृपेने शहराची सेवा करण्याची संधी मिळाली -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश चतुर्थीनिमित्त आमदार संग्राम जगताप व सौ. शितलताई जगताप यांच्या हस्ते गणपतीची महापूजा करण्यात आली. तर जगताप परिवाराच्या वतीने विशाल गणेश मंदिरास 1 लाख रुपये देणगी देण्यात आली.

श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या वतीने आमदार जगताप यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पार्वतीबाई जगताप, मंदा जगताप, सुवर्णाताई जगताप, मंदिराचे महंत संगमनाथ महाराज, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त प्रा. माणिकराव विधाते, ज्ञानेश्वर रासकर, डॉ. विजय भंडारी, मनिष फुलडहाळे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने होत असते. श्री विशाल गणेशाच्या कृपेने शहराची सेवा करण्याची संधी मिळाली असून, सर्वत्र विकास कामे सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.