• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे बैलपोळा उत्साहात साजरा

ByMirror

Sep 4, 2024
निमगाव वाघा येथे बैलपोळा उत्साहात साजरा

डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाने केले मिरवणुकीतील शेतकऱ्यांचे स्वागत

गावात ट्रॅक्टर आले असले तरीही, बैलांचा मान आजही कायम -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचे कामधेनू असलेल्या बैलांना आकर्षक सजवून गावातून ढोल, ताश्‍यांच्या गजरात गुलाल व भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणुक काढण्यात आली होती.


बैलांना सजवून मिरवणुकीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे बिरोबा मंदिर येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी स्वागत केले. यावेळी बिरोबा देवस्थानचे भगत नामदेव भुसारे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, पै. विकास निकम, भाऊसाहेब कापसे, सुभाष जाधव, राजेंद्र भुसारे, बाबा जाधव, आण्णा जाधव, गुलाब जाधव, गुलाब केदार, विजय जाधव, मयुर काळे आदी उपस्थित होते.


मिरवणुकीने शेतकऱ्यांनी मारुती, नवनाथ व बिरोबा मंदिर येथे बैलांना दर्शनास आनल्याने सजवलेल्या बैलांची जणू जत्राच गावात भरली होती. पै.नाना डोंगरे यांनी पोळा म्हणजे वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आधुनिक पध्दतीने शेता करण्यासाठी गावात ट्रॅक्टर आले असले तरीही, बैलांचा मान आजही कायम आहे. शेतकऱ्यांनी बैलाचे पूजन करुन आपली संस्कृती जोपासली असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *