• Tue. Jul 22nd, 2025

आमदार लंके यांनी केला रामदास फुले यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान

ByMirror

Dec 7, 2023

आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व सकल ओबीसी व्हिजेएनटी समाजाच्या वतीने फुले यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या सामाजिक कार्य व त्यांची सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, शिवाजी होळकर, शिवा कराळे, नेप्तीचे सरपंच संजय जपकर, जालिंदर शिंदे, उद्योजक अजय लामखडे, हिवरे जरेचे सरपंच भाऊसाहेब काळे, समता परिषदचे शाखाध्यक्ष शाहूराजे होले, आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे महेंद्र चौगुले, भानुदास फुले, कुमार होळकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, संभाजी गडाख, नितीन कदम, नितीन पुंड, बाळनाथ पुंड आदीसह आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार निलेश लंके म्हणाले की, गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान देणारे रामदास फुले यांचे कार्य कौतुकास्पद आहे. मोठ्या तळमळीने समाज कार्यात फुले अग्रेसर असून, त्यांचे समाजकार्य गावाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.


तसेच सकल ओबीसी व्हिजेएनटी समाजाच्या वतीने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते देखील रामदास फुले यांचा सत्कार करण्यात आला. फुलसौंदर यांनी समाजासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून फुले यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तर सामाजिक संवेदना जागरुक ठेऊन फुले यांच्या सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *