• Tue. Jan 20th, 2026

भिंगारहून निघालेल्या शिर्डी साई दिंडी सोहळ्यात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा सहभाग

ByMirror

Jan 20, 2026

साई सोहम परिवाराची 16 वी साई दिंडी भक्तिभावात


साई दिंडी सोहळा माणुसकी, सेवा आणि समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतो -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील साई सोहम परिवार व साई मंदिर सौरभनगर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिर्डी साई दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिंडीचे हे सलग 16 वे वर्ष असून, यंदाही मोठ्या उत्साहात व श्रद्धेच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.


या दिंडीत भिंगार परिसरातील भाविकांसह हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “सबका मालिक एक” या साईबाबांच्या संदेशाचा जयघोष करत, भजन, अभंग व नामस्मरणाच्या गजरात दिंडीने शिर्डीच्या दिशेने प्रस्थान केले. दिंडीदरम्यान भाविकांना शिर्डी येथील साईबाबांचे तसेच शनिशिंगणापूरचे दर्शन घडविण्यात आले.


या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे ह.भ.प. रेखाताई मडावी व डॉ. अतुल मडावी यांचा पुढाकार व नियोजन मोलाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीतील प्रत्येक भाविकाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. या दिंडीत संजय सपकाळ, संगीता सपकाळ, डॉ. अतुल मडावी, पूजाताई मडावी, अशोक पराते, आशाताई पराते, किशोर सोमानी, हेमलता सोमानी, शेषराव पालवे, चंद्रकला पालवे, राजू कांबळे, हेमाताई कांबळे, तुषार घाडगे, पुनम घाडगे यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले होते.
दिंडीदरम्यान हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, जहीर सय्यद, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, रतन मेहेत्रे, मनोहर दरवडे, विलास आहेर, दीपक घोडके, अविनाश जाधव, मुन्ना वागस्कर, सुधीर कपाळे, सरदारसिंग परदेशी, दशरथराव मुंडे, कुमार धतुरे, अशोकराव पराते, सर्वेश सपकाळ, रेखाताई मडावी, ह.भ.प. संगीताताई कापसे, अभिजीत सपकाळ, माधवी माळगे, वैष्णवी सोमानी, महिमा माळगे, नक्षत्रा घाडगे, अविनाश पोतदार, सुनील गुरव, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, किरण फुलारी, सूर्यकांत कटोरे, ओम माळगे, एकनाथ जगताप, साईराज सोमानी, संजय भावसार, दत्तात्रय लाहुंडे, मनोज पाल, राजेंद्र पांढरे, विनायक भगत, भरत नारद, ओम घाडगे, भागचंद शिंदे, सखाराम आळकुटे, विनोद खर्डे, बाळासाहेब देठे आदी उपस्थित


दरम्यान, राहुरी येथे ह.भ.प. विलास महाराज मदने यांनी दिंडीचे स्वागत करत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या अध्यक्ष व सर्व सदस्यांच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. त्यांनी अशा उपक्रमांतून समाजात भक्ती, एकोप्याची भावना आणि सकारात्मकता वाढते, असे मत व्यक्त केले.


संजय सपकाळ म्हणाले की, “साईबाबांचे विचार हे केवळ मंदिरापुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणे ही खरी भक्ती आहे. साई दिंडीच्या माध्यमातून आम्ही केवळ शिर्डीपर्यंतचा प्रवास करत नाही, तर माणुसकी, सेवा आणि समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतो. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक आणि अध्यात्मिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *