• Sat. Sep 20th, 2025

शिवजयंतीच्या कार्यक्रमात विखे यांच्या भेटीगाठी

ByMirror

Mar 28, 2024

व्यापारी, दुकानदार, कार्यकर्ते व नागरिकांशी साधला संवाद

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात तिथीप्रमाणे साजरी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजप कडून नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेले डॉ. सुजय विखे यांनी चौका-चौकात विविध मंडळांना भेटी दिल्या.

अभिवादन कार्यक्रमात सहभागी होवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर डाळमंडई, मंगलगेट, सराफ बजार, नेता सुभाष चौक आदी विविध ठिकाणी जावून व्यापारी, दुकानदार व नागरिकांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या.


माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यासह मोटारसायकलवर बसून विखे यांनी गुरुवारी (दि.28 मार्च) शहरातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या. मंगलगेट येथील मिलिंद तरुण मंडळ, बजरंग ग्रुपच्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी होवून त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

तर काही धार्मिक कार्यक्रमांना देखील विखे यांनी भेटी दिली. यावेळी माजी नगरसेवक सचिन जाधव, बंटी ढापसे, राजू शिंदे, बंटी बेद्रे, बबलू ढापसे, आकाश सरोदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *