प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम
भारतीय संस्कृतीचा जागर करुन महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने भारतीय संस्कृतीचा जागर करुन महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र देण्यात आला. तर यावेळी महिलांच्या पारंपारिक वेशभूषेवर मॅचिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात महिलांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. तर यावेळी रंगलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
पार्वती अरुणकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वानंदी हास्य क्लबच्या संचालिका छाया बंडगर, कविता दरंदले, ज्योती कानडे, उषा सोनटक्के, विद्या बडवे, स्वाती गुंदेचा, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, मेघना मुनोत, उषा सोनी, मनीषा देवकर, नीता प्रथमशेट्टी, शुभदा देवकर, हिरा शहापुरे, सुरेखा बारस्कर, मंजुषा सावदेकर, वंदना गोसावी, उज्वला धस, लता कांबळे, प्रतिभा भिसे, संगीता गांधी, राखी जाधव, राजश्री पोहेकर, सोहनी पुरवाळे, अर्चना बोरुडे, ज्योत्स्ना कुलकर्णी, संगीता गांधी, शकुंतला जाधव, सुजाता पुजारी, शशिकला झरेकर, नीलिमा पवार, उज्वला बोगावत आदींसह ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पार्वती जगताप म्हणाल्या की, परंपरा व संस्कृतीचा वारसा महिला चालवत आहे. कुटुंबात राहून समाजाला संस्कारी करण्याचे काम महिला वर्ग करत आहे. महिला सक्षम झाल्यास व संस्कारी मुले-मुली घडविल्यास त्या कुटुंबाचा आणि समाजाचा विकास साधला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
छाया बंडगर यांनी जीवनात आनंदी व निरोगी राहण्यासाठी हास्य ही गुरुकिल्ली असल्याचे स्पष्ट करुन महिलांनी आपले नातेसंबंध, घर सांभाळून इतर छंद कसे जोपासता येतील यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत जयाताई गायकवाड यांनी केले.
यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजन, कौशल्यात्मक व बौध्दिक स्पर्धा रंगल्या होत्या. मेघना मुनोत यांनी घेतलेल्या विविध स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांच्या पारंपारिक वेशभूषेवर मॅचिंग स्पर्धेत दादी-नानी ग्रुप प्रथम- तारा लढ्ढा, द्वितीय- मंजुषा सावदेकर, तृतीय- जयश्री बोगावत, प्रयास ग्रुप प्रथम- सुरेखा बारस्कर, द्वितीय- वैशाली उठ्ठेकर, तृतीय- अनिता गोयल यांनी बक्षीसे पटकाविली. स्पर्धेचे बक्षीस दादी-नानी ग्रुपच्या सचिव जयश्री पुरोहित यांच्या वतीने देण्यात आले. चंदुकाका सराफ (बारामतीकर) यांच्या वतीने सर्व महिलांना हळदी-कुंकूचे वाण देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बडवे यांनी केले. आभार शुभदा देवकर यांनी मानले.