• Tue. Feb 24th, 2026

केडगावातील मंगल कार्यालय व्यावसायिकाला फोनवरून दमदाटी

ByMirror

Feb 24, 2026

कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव परिसरातील एका मंगल कार्यालय व्यावसायिकाला मोबाईलवरून शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी सोमवारी (दि. 23 फेब्रुवारी) कोतवाली पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


तक्रारदार प्रफुल्ल नवनीत सुरपुरिया (रा. विनायक नगर, केडगाव) हे मंगल कार्यालय व्यवसायाशी संबंधित आहेत. रविवारी (दि. 22 फेब्रुवारी) रात्री त्यांना पोपट कराळे यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधला. संभाषणादरम्यान “तू कमी किमतीत मंगल कार्यालयाची सुपारी देतोस, त्यामुळे आमच्या व्यवसायाचे नुकसान होत आहे,” असा आरोप करत सुरपुरिया यांना शिवीगाळ करण्यात आली तसेच दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


घटनेनंतर प्रफुल्ल सुरपुरिया यांनी त्वरित कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *