• Wed. Jul 2nd, 2025

मराठी पत्रकार परिषदेचे पत्रकारांचे प्रश्‍न सोडण्याबाबत शासनाला निवेदन

ByMirror

Jun 13, 2025

ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना व पत्रकार कल्याण निधीच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- पत्रकारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी शासनाने विविध पत्रकार संघटनांकडून अभिप्राय, सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार मराठी पत्रकार परिषदेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि डिजीटल मीडिया परिषदने पत्रकारांचे प्रश्‍न सोडवण्याबाबत शासनाला निवेदन देऊन सूचनावजा मागणी केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा माहिती अधिकाऱ्याना देण्यात आले.


राज्यातील पत्रकारांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्याबाबत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, शरद पाबळे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सचीव सुरेश नाईकवाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा शासनाकडे पत्रकारांच्या प्रश्‍नाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.


पत्रकारांचे प्रलंबीत प्रश्‍न सुटावेत या अनुषंगाने राज्य शासनाने आचार्य बाळाशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील अटी शर्तीबाबत, तसेच शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या तरतुदीमध्ये आवश्‍यक सुधारणा, आजारपणासाठीच्या मदत निधीबाबत सुधारणा, योजनेमध्ये कोणत्या आजाराचा समावेश असावा, पत्रकारांच्या मृत्यूनंतर वारसांना द्यावयाची मदत किती असावी आदी बाबत विविध पत्रकार संघटनांचे मागण्या, मत आणि सूचना जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत मागवल्या आहेत. त्यानुसार अहिल्यानगर येथे मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, अधिस्विकृती समितीच्या नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, हल्ला कृती समितीचे समन्वयक बंडु पवार तसेच डिजीटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख, बाबा ढाकणे, सचिन मोकळ, मोहसीन शेख, दिपक वाळुंजकर यांनी माहिती अधिकारी अमोल महाजन यांच्याकडे निवेदन देऊन शासनाने पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात आणि आचार्य बाळाशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील अटी शिथील करण्याबाबत तसेच शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या तरतुदीमध्ये आवश्‍यक सुधारणा करण्याबाबतच्या सूचना निवेदनातून केल्या आहेत.

राज्य शासनाने आचार्य बाळाशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील अटी न शर्ती, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या तरतुदीमध्ये आवश्‍यक सुधारणा आदीबाबत मागणी केल्यानुसार सूचना व मागण्याचे निवेदन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने माहिती अधिकारी अमोल महाजन यांना देताना मन्सूरभाई शेख, विजयसिंह होलम, सूर्यकांत नेटके, बंडु पवार.

राज्य शासनाने आचार्य बाळाशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील अटी न शर्ती, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या तरतुदीमध्ये आवश्‍यक सुधारणा आदीबाबत मागणी केल्यानुसार सूचना व मागण्याचे निवेदन डिजीटल मीडिया परिषदेच्या वतीने माहिती अधिकारी अमोल महाजन यांना देताना जिल्हाध्यक्ष आफताब शेख, बाबा ढाकणे, सचिन मोकळ, मोहसीन शेख, दिपक वाळुंजकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *