आंदोलनास पाठिंबा दर्शवून लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथील आंदोलनात पोलीसांकडून झालेल्या लाठी चार्जचा शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवून आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला. तर लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले.
यावेळी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, युवा जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, अक्षय कातोरे, युवा शहर प्रमुख पै. महेश लोंढे, उपशहर प्रमुख विशाल शितोळे, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, नगरसेवक रविंद्र लालबोंद्रे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अंतरवाली सराटी येथे पोलीसांनी मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमुळे वयस्कर महिला, नागरिक जखमी झाले. या घटनेचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
