• Wed. Oct 29th, 2025

नगरची माहिरा शेख ठरली पुण्याच्या डिवाइन ग्लोबल ब्युटी स्पर्धेची विजेती

ByMirror

Oct 7, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील माहिरा रेहान शेख हिने पुणे येथे झालेल्या डिवाइन इंडियन इंटरनॅशनल व ग्लोबल ब्युटी ऑफ इंडिया 2023 सौंदर्य स्पर्धेत किड्स कॅटेगरीमध्ये विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यातील स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते.


पुणे एस ॲण्ड ए ट्रेंड्स ॲण्ड प्रोडक्शन आणि एकउमंग फाऊंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन टप्प्यात ही स्पर्धा पार पडली. मिसेस, मिस्टर आणि किड्स या तिन विभागात स्पर्धा घेण्यात आली. पारंपारिक आणि पाश्‍चिमात्य पेहराव आणि प्रश्‍नमंजुषा या फेऱ्यांसह स्पर्धकांची चाल, आत्मविश्‍वास व परिचय या गुणांच्या आधारावर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी यावेळी लावणी सम्राट आश्‍मिक कामठे, मराठी कलाकार हिंदवी पाटील, बिग बॉस फेम तृप्ती देसाई, अविनाश संकुदे, कार्यक्रमाचे आयोजक अंजली जंगम, दिग्दर्शक सतीश फुगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. किड्स कॅटेगरीतील विजेत्या मायरा शेख हिला मानाचा क्राऊन, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण पयान्नेल, सिध्देश जाधव, श्‍वेता परदेशी, शंतनु भामरे यांनी केले.


माहिरा शेख ही अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियमची विद्यार्थीनी असून, ती इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *