• Mon. Nov 3rd, 2025

केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

ByMirror

Jun 16, 2024

पहिल्याच दिवशी 100 टक्के विद्यार्थ्यांनीची उपस्थिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा केला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी उत्साहाने विद्यालयात प्रविष्ठ झाल्या. शाळेत आलेल्या नवोदित मुलींचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले.


प्रारंभी औक्षण करून भेटवस्तू देऊन लेझीम व झांजपथकाने त्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्याचे वाटप प्राचार्या वासंती धुमाळ व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.


प्राचार्या वासंती धुमाळ म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या शालेय दशेमध्ये योग्य मार्गदर्शनाची खरी गरज असते. ते काम शिक्षक वृंद करत असतात. त्या माध्यमातून चांगल्या विद्यार्थिनी घडवल्या जातात, सक्षम झालेल्या मुली भारताचे उज्वल भविष्य आहे.विद्यालयामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थीनि शिक्षण घेत असून, त्यांना चांगल्या दर्जेचे शिक्षण दिले जात आहे.

शिक्षणाबरोबरच आपली संस्कृती व संस्कार तितकेच महत्त्वाचे असून, ते जोपासली जात असल्याचे, त्या म्हणाल्या. विद्यालयाच्या सुरेखा गरड व जयश्री कोतकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री वायभासे यांनी केले. आभार भारती गुंड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *