• Mon. Feb 16th, 2026

भिंगारच्या श्री जगदंबा मंदिरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाआरती

ByMirror

Oct 18, 2024

भाविकांना महाप्रसादाचे वाटप; सपकाळ परिवाराला आरतीचा मान

नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील शुक्रवार बाजार परिसरातील श्री जगदंबा (मोहटा देवी) मंदिरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाआरती करण्यात आली. तर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.


हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते देवीची आरती करुन महाप्रसाद वाटपास प्रारंभ करण्यात आले. याप्रसंगी शारदा शिंदे, संगीता सपकाळ, प्रांजली सपकाळ, राजश्री शिंदे, सुरेखा शिंदे, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, जालिंदर अळकुटे, दिपक शिंदे, प्रसाद शिंदे, अभिषेक शिंदे, संतोष होणे, संतोष गायकवाड, ईवान सपकाळ, बाबासाहेब बेरड, अभिजीत सपकाळ, सुनील दुधाडे, शिवनारायण, सदाशिव नागापुरे, सुनील कजबे, बाबासाहेब नागपुरे, आनंद शिंदे, शंकर बहिरट आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.


विठ्ठल (मामा) शिंदे व इंदुबाई शिंदे दांम्पत्य मागील 40 ते 45 वर्षापासून देवीची सेवा करत असून, दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला महाआरती करुन भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करत असतात. यावर्षी देखील या धार्मिक सोहळ्याला भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आराधी किरण नेटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील देवीची आरती केली. या सोहळ्यासाठी देवीभक्त सदाशिव शिंदे, कैलास शिंदे, देविदास शिंदे शारदाताई शिंदे, सुरेखाताई शिंदे व शिंदे परिवाराचे विशेष योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *