• Sun. Jun 1st, 2025

लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहास प्रारंभ

ByMirror

Oct 2, 2024

माळीवाडा येथील महात्मा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वस्तीगृहाला रोपांची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताहाचे प्रारंभ करण्यात आले. माळीवाडा येथील महात्मा विद्यार्थी वस्तीगृहातील (महात्मा फुले छात्रालय) विद्यार्थ्यांना थंडीनिमित्त ब्लँकेट, चॉकलेट व अल्पोपहाराचे वाटप करुन या सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला. तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वस्तीगृहाला झाडे लावण्यासाठी रोपं भेट देण्यात आली.


प्रारंभी वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सेवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लायन्सच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, सचिव डॉ. सिमरन वधवा, खजिनदार अंजली कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख हरजितसिंह वधवा, किरण भंडारी, धनंजय भंडारे, नितीन मुनोत, आनंद बोरा, संतोष मानकेश्‍वर, प्रणिता भंडारी, राजबीरसिंह संधू, प्रशांत मुनोत, प्रशांत गाडेकर आदींसह लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. अनघा पारगावकर म्हणाल्या की, लायन्स आंतराष्ट्रीय संघटनेच्या प्रणाली नुसार 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान जागतिक सेवा सप्ताह सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजातील गरजू व वंचित घटकांना आधार देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. सिमरन वधवा यांनी सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आरोग्याच्या प्रश्‍नावर देखील विविध शिबिर घेऊन गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *