• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

लायन्स क्लबच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान

ByMirror

Jul 2, 2025
लायन्स क्लबच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान

प्रत्येक संकटात डॉक्टर सेवा देण्यासाठी सज्ज -डॉ. संजय असनानी

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान करुन डॉक्टर आणि सीए दिवस साजरा करण्यात आला. रुग्णांसाठी देवदूताची भूमिका पार पाडणारे डॉक्टर व आर्थिक नियोजनाची घडी बसविणारे सीए यांचा सत्कार करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय असनानी, सचिव प्रशांत मुनोत, कोषाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख डॉ. अमित बडवे, डॉ. मीरा बडवे उपस्थित होते.


डॉ. संजय असनानी म्हणाले की, समाजात सर्वात मोठी सेवा म्हणजे रुग्णसेवा होय. प्रत्येक संकटात डॉक्टर सेवा देण्यासाठी सज्ज असतात. हे कोरोना काळात सर्व डॉक्टर बांधवांनी दाखवून दिले. वेदना दूर करण्यासह मनुष्याला नवजीवन देण्याचे कार्य डॉक्टर करतात. तर सीए आर्थिक नियोजन करुन त्यांच्या सल्ल्याने व्यवसाय, उद्योगाची भरभराट होत असते. समजात कार्यरत असलेले डॉक्टर व सीए अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. अमित बडवे म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टरांनी जीवाची बाजी लावून अनेकांना जीवदान दिले. डॉक्टर हा रुग्णांची सेवा करुन त्यांना नवजीवन देणारा देवदूत आहे. तर समाजातील आर्थिक गणित उत्तम ठेवण्याचे कार्य सीए करीत असतात. या दोन्हींच्या योगदानाने देशाची प्रगती साधली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


या कार्यक्रमात डॉक्टर असलेल्या युवक-युवतींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. उपस्थितांच्या हस्ते डॉ. मानसी असनानी, डॉ. सिमरन वाधवा, डॉ. अनघा परगावकर, ओरल सर्जन डॉ. तुलसी कृष्णा, डॉ. आकांक्षा गार्जे, ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ. राजलक्ष्मी राय, सीए किरण भंडारी, ऑन्को सर्जन डॉ. अद्वैत वैद्य, डॉ. सचिन घुले, डॉ. अंजू घुले, डॉ. नीरज गांधी, डॉ. भूषण खराचे, गणेश गाव्हाणे, डॉ. सतीश सूपेकर, डॉ. गणेश झरेकर, डॉ. तेजश्री जुंगडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हरजितसिंह वधवा, अरविंद पारगावकर, संतोष माणकेश्‍वर, सुनिल छाजेड आदींसह लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *