युवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
शैक्षणिक जागरुकतेवर करणार मार्गदर्शन; तर कुरान हदीस झालेल्या 27 युवकांचा होणार गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसा व आयटीआय महाविद्यालयात मुस्लिम समाजातील युवकांसाठी शैक्षणिक जागरुकतेवर मंगळवारी (दि.31 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात हैदराबादचे प्रेरक वक्ते मुनव्वर जमा व जामिया इस्लामीया इशत उल उलुम अक्कलकुआ या संस्थेचे सीइओ मौलाना हुजैफा वस्तानवी मार्गदर्शन करणार आहे.
बाराबाभळी येथील मदरसाच्या मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्व समाजबांधवांना व युवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मदरसा मधील कुरान हदीस झालेल्या 27 युवकांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. धार्मिक शिक्षणाबरोबरच, शालेय शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व सांगून युवकांना दिशा देण्याचे कार्य केले जाणार असल्याची माहिती बाराबाभळी मदरसाचे नाजीम कारी मोहंमद शादाब यांनी दिली आहे.
