पारंपारिक वाद्यात पोतराजसह निघालेल्या शोभायात्रेने वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने आषाढी अमावस्यानिमित्त लालटाकी येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात पार पडली. मंडळाचे अध्यक्ष साहेबराव काते यांच्या मार्गदर्शानाखाली निघालेल्या शोभायात्रेत पारंपारिक वाद्यांच्या गजरात पोतराज व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
साहेबराव काते हे महालक्ष्मीचे भक्त असून, सालाबाद प्रमाणे दरवर्षी ते यात्रा उत्सवाचे आयोजन करुन, शोभायात्रा काढत असतात. या सोहळ्याचे हे 23 वे वर्ष असून. या शोभायात्रेचे प्रारंभ लालटाकी भारस्कर कॉलनी येथून झाले. पारंपारिक वाद्यांचे गजर व लक्षीमातेच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला. सर्जेपुरा, दिल्लीगेट, न्यु आर्टस महाविद्यालय मार्गे लालटाकी येथील लक्ष्मीमाता मंदिरात या शोभायात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेनंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याचा भाविकांसह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी साहेबराव काते, सुशिलाबाई काते, आदिनाथ काते, योसेफ काते, राजू काळुंखे, मच्छिंद्र वैरागर, बहिरुनाथ वैरागर, सागर काते, संदीप त्रिभुवन, दत्तात्रय जाधव, अलंकार भोगले, यश जाधव, अनिता जाधव, आशाबाई मोहिते, सुनिल वैरागर, कार्तिका वाघमारे, भारती कुचेकर, गुनाबाई भोसले, भाग्यश्री मोहिते, संगिता कांबळे, सिताबाई वडागळे आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.