अध्यक्षपदी इंजि. झुंबरराव बोरुडे व उपाध्यक्षपदी सिद्धेश्वर देशमुख यांची निवड
श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात उभारले जाणार स्व. भगवंतराव देशमुख यांचे स्मारक
नगर (प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात स्व. इंजिनिअर भगवंतराव देशमुख यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे. यासाठी स्व. भगवंतराव देशमुख स्मारक समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी इंजि. झुंबरराव बोरुडे व उपाध्यक्षपदी सिद्धेश्वर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
स्व. इंजिनिअर भगवंतराव देशमुख यांचे स्मारक उभारणीचा आराखडा अहिल्यानगरचे आर्किटेक इंजि. अनिल घोडके यांनी तयार करून दिला आहे. हे काम आकर्षकपणे आणि लवकर पूर्ण करण्यासाठी स्मारक समितीची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी सुरेश लांडगे, ॲड. मनोज देशमुख, दत्तात्रय बोरुडे, विजय झगडे, धनंजय लोखंडे यांचा समावेश आहे.
स्मारकाच्या कामासाठी लवकरच निधी संकलनाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे अध्यक्ष झुंबरराव बोरुडे आणि उपाध्यक्ष सिद्धेश्वर देशमुख यांनी सांगितले. स्मारक समितीच्या कामासाठी सर्व ग्रामस्थांनी देणगी देऊन सहकार्य करावे असे आवाहन बाळासाहेब देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद देशमुख 9284296192 यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.