• Tue. Jul 22nd, 2025

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचा कर्मवीर पारितोषिकने गौरव

ByMirror

May 13, 2025

शाळेच्या गुणवत्तेचा सातारा मध्ये डंका


मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील, खासदार सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

नगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयास संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 चे सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ कर्मवीर पारितोषिक मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे, सचिव विकास देशमुख, सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, बी.एन. पवार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के आदी उपस्थित होते.


रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथी निमित्ताने सातारा येथील कर्मवीर समाधी परिसरात झालेल्या कार्यक्रमात विद्यालयाच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्याध्यापिका छायाताई काकडे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, उत्तर विभागीय अधिकारी तथा मॅनेजिंग कौन्सिल सदस्य नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, माजी प्राचार्य विश्‍वासराव काळे, कैलासराव मोहिते, ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे, प्रभाकर थोरात, राजेंद्र देवकर, लेखनिक विजय मोहिते, ग्रंथपाल सुप्रिया निमसे यांनी शाळेच्या वतीने पुरस्कार स्विकारला.


संस्थेतील सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त विद्यालयाचे पुनर्मूल्यांकन करून दिला जाणारा हा सर्वोच्च गुणवत्तेचा मानाचा पुरस्कार समजला जातो. सदर पारितोषिक मिळण्यामध्ये विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान आहे. विद्यालयात सर्व सेवकांना बरोबर घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. विद्यालयास प्राप्त पुरस्कारामुळे सर्व शिक्षक व सेवक वर्गाचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *