• Sat. Mar 15th, 2025

लायबा इंटरनॅशनल हज उमराह टुर्सने घडविली भाविकांनी उत्तमप्रकारे हजयात्रा

ByMirror

Aug 5, 2024

टुर्सच्या उत्तम सेवेने भाविक भारावले

सेवाभावीवृत्तीने भाविकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध -अमजद खान

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लीम धर्मीयांमध्ये हज आणि उमराह या यात्रांना अतिशय महत्त्व आहे. आयुष्यात एकदा तरी या पवित्र ठिकाणी भेट देण्याची इच्छा मुस्लीम बांधवांना असते. यावर्षी हजला गेलेल्या भाविकांची शहरातील लायबा इंटरनॅशनल हज, उमराह टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या वतीने यशस्वी यात्रा घडविण्यात आली आहे. तर वर्षभर लायबाच्या माध्यमातून उमराह ची यात्रा सुरु असते. भाविकांना उत्तमप्रकारे मिळणारी सर्व प्रकारच्या सेवेमुळे भाविकांचा देखील या टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सला पसंती मिळत असल्याची संचालक माहिती अमजद खान यांनी दिली.


सौदी अरेबियातील मक्का येथे दरवर्षी हज यात्रा असते. तर वर्षभर भाविक उमराहसाठी मुस्लिम यात्रेकरू मक्का या पवित्र शहरात जातात. हज यात्रेला इस्लाम धर्मातील प्रमुख पाच कर्तव्यांपैकी एक मानले जाते. तर कोरोनानंतर उमराह करण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे.

लायबा इंटरनॅशनल हज, उमराह टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सेवाभाव वृत्तीने अल्पदरात भाविकांना सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्रातून या ट्रॅव्हल्सला पसंती मिळत आहे. मक्का जवळील हॉटेल, उत्तम प्रकारची सेवा, भारतीय पध्दतीचे उत्तम जेवण आदी सुविधा हे लायबा चे खास वैशिष्टये आहे. नुकतेच हजला गेलेले 100 यात्रेकरु आपली हजयात्रा पूर्ण करुन परतले आहेत.

उत्तम प्रकारची सेवा देऊन कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे देखरेख करण्यात आल्याची भावना यात्रेकरु भाविकांनी व्यक्त केली. यात्रा करुन परतलेल्या भाविकांचे मुकुंदनगर येथील लायबा इंटरनॅशनल हज, उमराह टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *