महासचिवपदी तेजस आवचार यांची नियुक्ती
आरक्षणाची वर्गवारीप्रमाणे अंमलबजावणी होण्यासाठी लहुजी शक्ती सेना आंदोलनाच्या पावित्र्यात
नगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेची सर्वसाधारण बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये पारनेर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करुन महासचिवपदी तेजस शिवाजी आवचार यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीसाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन बैठकीचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी पारनेर तालुका अध्यक्ष कृष्णाभाऊ शेलार, जिल्हा महासचिव, किरण उमाप, प्रा. पोटे सर, मधुकर पठारे साहेब, मा. मुख्याध्यापक अरुण शिंदे, संजय शेलार, रामदास साळवे, रोहित जाधव, अमीर तांबोळी, गायकवाड आदी उपस्थित होते.
वर्गवारी आरक्षणासाठी लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन, उपोषण व न्यायालयीन मार्गाने लढा यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षणाची अ, ब, क, ड प्रमाणे वर्गवारीची अंमलबजावणी होण्याच्या मागणीसाठी संघटना प्रयत्नशील असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे व प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरु असल्याचे बैठकीत स्पष्ट करुन उपस्थित प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात हक्काच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक मधुकरराव पठारे व माजी तालुका अध्यक्ष विशाल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका अध्यक्ष कृष्णाभाऊ शेलार यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. मातंग समाजासह सर्व बहुजन समाजातील वंचित उपेक्षितांच्या न्याय, हक्कासाठी एकजुटीने कार्य करण्याचा नूतन पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला.
लहुजी शक्ती सेनेची पारनेर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:-
महिला अध्यक्षा- राणीताई उमाप, विधानसभा अध्यक्ष- युवराज अवचार, महासचिव- तेजस अवचार,
युवक अध्यक्ष- विकास साळवे, कार्याध्यक्ष- सूर्यभान वैराळ, उपाध्यक्ष- गणेश राजहंस (निघोज गट), देवेंद्र आबुराव आल्हाट (सुपा गट), युवक उपाध्यक्ष- विवेक साठे, संघटक- रामदास शेलार.