किर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमास भाविकांची उपस्थिती
जय हिंदने जिल्ह्यात वृक्षरोपण चळवळीला गती दिली -शिवलीला पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून कोल्हार गडावरील महादेव मंदिर परिसरात निसर्गरुपी भगवान शंकराची पिंड फुलविण्यासाठी लावण्यात आलेल्या पाचशे झाडांचा चौथा वाढदिवस किर्तन व महाप्रसादाने साजरा करण्यात आला. शिवलीला पाटील यांच्या किर्तनासाठी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हारच्या (ता. पाथर्डी) गडावर चार वर्षापूर्वी वडाच्या झाडाद्वारे भगवान शंकराची पिंड फुलविण्यासाठी तब्बल पाचशे झाडे लावण्यात आली आहे. त्याचे सवर्धन करुन ही झाडे फुलली आहे. या झाडांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य एकनाथ आटकर, बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे, मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, युवा नेते उद्धव दुसुंगे, सुनिल परदेशी, व्याख्याते कुणाल परदेशी, उद्धव काळापहाड, सचिन शिदोरे, उपसरपंच सुनील मिरपगार, कोल्हारचे सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, निवृत्त मुख्याध्यापक महादेव पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, शंकरराव डमाळे, माजी सरपंच बाबाजी पालवे, किशोर पालवे, नामदेव जावळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पालवे, ईश्वर पालवे, सोपान पालवे, नवनाथ पालवे, अभिजीत पालवे, अक्षय डमाळे, अशोक गर्जे, सतिष पालवे, संतोष पालवे, विक्रांत पालवे, अशोक पालवे, अंकुश पालवे, किरण पालवे, रमेश पालवे, सुभाष पालवे, नामु पालवे, चंदू नेटके, रामा नेटके, चंदू पालवे, अक्षय पालवे, महेश जावळे, जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, रोहिदास पालवे, अशोक गर्जे, महादेव शिरसाट, अशोक जावळे, शंकर पालवे, कैलास पालवे, भाऊसाहेब पालवे, साहेबराव पालवे, बाबाजी पालवे, एकनाथ पालवे, सुनिता गर्जे, लिला पालवे, जनाबाई डमाळे, सरस्वती डमाळे, साईनाथ चितळे, नवनाथ पालवे आदी उपस्थित होते.

शिवलीला पाटील यांनी माजी सैनिकांच्या पर्यावरण रक्षणासाठी सुरु असलेली धडपड कौतुकास्पद आहे. वृक्षरोपण करुन न थांबता त्याच्या संवर्धनाची घेतली जाणारी जबाबदारी देखील प्रेरणादायी आहे. जय हिंदच्या माध्यमातून वृक्षरोपण चळवळीला गती मिळाली असून, पाचशे वडाची भगवान शंकराची पिंडाने गडाला वेगळे वैभव प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ आटकर, वैभव खलाटे, बाबाजी पालवे, उद्धव दुसंगे, दिनकर डमाळे, उद्धव काळापहाड, कुणाला परदेशी यांनी मनोगतामध्ये फाऊंडेशनच्या पर्यावरणावर सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.
गडावरील पिंडीच्या आकारामध्ये लावलेल्या वटवृक्षाच्या मध्यभागी भगवान शंकराचे मंदिर असून या मंदिराचे काम लवकरच सुरू होणार आहे. मंदिर हे प्रती केदारनाथ मंदिराप्रमाणे बांधकाम होणार असून, या मंदिराचे महाज्योतिर्लिंग केदारेश्वर मंदिर अशी ओळख अहमदनगर जिल्ह्यामध्ये होत आहे. उंच डोंगरावर निसर्गरम्य परिसर व पाचशे झाडांचा निसर्गाचा सानिध्य अनुभवायला मिळणार असल्याचे शिवाजी पालवे यांनी सांगितले. आभार माजी सैनिक शिवाजी गर्जे यांनी मानले.
