गावात जल्लोष करुन गुलालाची उधळण
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी किरण सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची निवड झाली असता गावात जल्लोष करुन गुलालाची उधळण करण्यात आली.

प्रमोद जाधव यांनी एक वर्षानंतर उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या जागेवर मंगळवारी (दि.18 फेब्रुवारी) उपसरपंच पदासाठी सदस्यांची निवडणुक प्रक्रिया पार पडली. सरपंच लता फलके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संजय कापसे, सुजाता कापसे, अलका गायकवाड, उज्वला कापसे, पै. नाना डोंगरे, प्रमोद जाधव, मुन्नाबी शेख आदी उपस्थित होते.
उपसरपंच पदासाठी सुभाष जाधव यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने, सदर सभेमध्ये किरण जाधव यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. या निवडीनंतर ग्रामपंचात व सर्व सदस्यांच्या वतीने जाधव यांचा सत्कार करण्यात आला. निवडणुक प्रक्रिया ग्रामपंचायत अधिकारी गोवर्धन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी दिपक जाधव, गणेश येणारे, नवनाथ फलके, सोमनाथ आतकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.