आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून कायनेटिक चौकतील प्रलंबीत प्रश्न मार्गी
नगरकर शहर विकासाचे साक्षीदार -प्रा. माणिक विधाते
नगर (प्रतिनिधी)- सर्व नगरकर शहर विकासाचे साक्षीदार असून, शहर बदलत आहे. सध्याच्या शहरात पूर्वीपेक्षा मोठा बदल झाला आहे. शहरीकरण वाढत असताना उपनगरे देखील झपाट्याने वाढली. शहरासह त्या उपनगरांचादेखील विकास करण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले. महापालिकेत निधीची कमतरता असल्याने राज्य सरकारकडून कोट्यावधीचा निधी आणून त्यांनी शहराच्या विकासकांमांना चालना दिली. अडीच वर्ष कोरोनामुळे वाया गेली, फक्त अडीच वर्षात झालेली ही विकास कामे असल्याची भावना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केली.
आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून कायनेटिक चौक रस्ता काँक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन कामाच्या शुभारंभाप्रसंगी प्रा. विधाते बोलत होते. याप्रसंगी आराध्य युवा प्रतिष्ठानचे मयुर बांगरे, संत रोहिदास महाराज सेवा संघाचे निलेश बांगरे, सुरेखा नाडे, शितल बडे, रोहिणी पालवे, मंगल शिरसाट, संगीता काळे, द्वारकाबाई वनवे, संगीता क्षीरसागर, सुमन जठार, मीरा शिंदे, आशा आव्हाड, आशाबाई होनमाने, सुनिता वाघमारे, चंद्रभागा दहिफळे, शितल दहिफळे, शोभा शिंदे, नंदूबाई आव्हाड, दशरथ (मामा) शिंदे, शेजुळ, प्रवीण आव्हाड, पिनु वनवे, कार्तिक जठार, आकाश वाघमारे, किरण लोखंडे, आकाश क्षीरसागर, सुरज आव्हाड, धीरज आव्हाड, सोमनाथ दहिफळे, बबलू भुजबळ, सागर सोबले, संतोष आव्हाड, अंबादास शिंदे, विष्णू आव्हाड, आकाश साखरे, बबलू काळे, राहुल शिरसाठ, राजू वनवे, संदीप बडे, अक्षय कोकरे, वसीम शेख, ओमकार शिंदे, संदीप साळवे, अशोक दहिफळे, रवी पिसे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निलेश बांगरे म्हणाले की, दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचा निधी आणून आमदार जगताप यांनी शहर विकासाला चालना दिली आहे. सर्वत्र विकास कामे सुरू आहेत. रस्ते, अद्यावत नाट्य संकुल, क्रीडा संकुल, उद्याने विकसित करण्याचे काम सुरू असून, बुरुडगाव येथे अद्यावत महापालिकेचा दवाखाना उभा राहत आहे. यातून सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. या विकास कामातून शहराला शहरीकरणाचे रुप प्राप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या परिसरात प्रलंबीत असलेला आव्हाड वीटभट्टी येथे रस्ता काँक्रिटीकरण व राजेंद्र गाडीळकर ते व्यवहारे घरापर्यंत ड्रेनेज लाईन कामाला प्रारंभ करण्यात आले आहे. सदर विकास काम सुरु झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करुन आमदार जगताप यांचे आभार मानले.