• Thu. Oct 30th, 2025

केडगाव येथे रंगलेल्या साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता

ByMirror

Sep 4, 2023

शाहूनगर परिसरातून निघालेल्या पालखी मिरवणूकीने वेधले लक्ष

रक्तदान शिबिराला साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्या धार्मिक कार्याने मानसिक समाधान मिळते, तिथे देवाचे अस्तित्व नक्कीच असते. नोकरी, व्यवसायानिमित्त आपण गाव सोडून इतरत्र स्थायिक होतो. अशा नवीन ठिकाणी मंदिराची उभारणी करून आपण पुन्हा एकत्र येण्याचा आनंद लुटतो. भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरुप निसर्गाशी जोडले असून, अध्यात्माने मन प्रफुल्लित होते व नकारात्मकता नष्ट होत असल्याचे प्रतिपादन सचिन कोतकर यांनी केले.


केडगाव येथील बँक कॉलनीतील श्री साईबाबा फाऊंडेशनच्या साईबाबा मंदिराचा दहावा स्थापना दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाने पार पडला. यावेळी मंदिर परिसरात साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यास केडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्याच प्रमाणे वरूनदेवांने सुद्धा कार्यक्रमास हजेरी लावली. या सोहळ्याची सांगता सचिन भानुदास कोतकर यांच्या हस्ते आरती व महाप्रसादाने झाली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित कातोरे, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव प्रकाश वाघ, डॉ. मुकुंद शेवंगावकर, अशोक झिने, अजितसिंग दाढीयाल, विजय गोरे, शिवाजी वाकचौरे, अशोक जाधव, कावेरी जाधव, संगिता कातोरे, नगरसेवक अमोल येवले, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका लता शेळके, भुषण गुंड, जालिंदर कोतकर, जयद्रथ खाकाळ, दडियाल भाभी, प्रकाश चांदेकर, दत्तात्रय टेके, राजू हजारे, हर्षदा कांडेकर आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे सचिन कोतकर म्हणाले की, श्रावण महिन्यात सर्व महत्त्वाचे सण उत्सव असतात. समाजात धार्मिक वातावरण निर्माण झालेले असतात. या धार्मिक सोहळ्याने सर्वांना आत्मिक आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रारंभी शाहूनगर परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. साई बाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. साईकथाकार माधुरीताई शिंदे यांच्या प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. साई सच्चरित्र ग्रंथ पारायण समारोपप्रसंगी साईंची धुपारती बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक झिने यांनी केले. आभार अजित कातोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *