आयुक्त डांगे यांनी पहाणी करुन कामाचे दिले आदेश
नगर (प्रतिनिधी)- शहरात नुकतेच झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊसाने मोठे नुकसान झाले आहे. या वादळी पावसाने केडगाव येथील स्मशानभूमीच्या शेडवर निलगिरीचे झाड कोसळल्याने शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे व माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी स्मशानभूमीत झालेल्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी इंजि. निंबाळकर, सुमित लोंढे, शरद ठुबे, सुनील तात्या सातपुते, युवा नेते सुजय मोहिते, सोन्याबापू घेंबूड, सूरज कोतकर, अक्षय कोतकर, ज्येष्ठ समाजसेवक नंदू पालवे यांच्यासह केडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वादळी पावसात केडगावच्या स्मशानभूमीत झाड पडल्याची माहिती मिळताच कोतकर यांनी घटना स्थळाची पाहणी करुन आयुक्त डांगे यांना कल्पना दिली.
आयुक्तांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांना कोसळलेले झाड हटवण्याचे आदेश दिले. पडलेले झाड हटविण्यात आले असून, या झाडमुळे स्मशानभूमीच्या शेडचे पूर्णत: नुकसान झाले आहे. आयुक्त डांगे यांनी कोसळलेल्या शेडचे लवकरात लवकर नव्याने काम करून देण्याचे आश्वासन दिले. मनोज कोतकर यांनी आयुक्तांचे आभार मानले व मागील पावसात पुराने वाहून गेलेल्या स्मशानभूमीच्या भिंतीचे काम सुरु असून, स्मशानभूमीतील इतर आवश्यक कामे देखील लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थांनी देखील मदतीला लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन धावून आल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.