• Wed. Oct 29th, 2025

कावेरी कैदके यांना दुबईमध्ये मेकअप मास्टर क्लासचा इंटरनॅशनल प्रमाणपत्र प्रदान

ByMirror

Jul 10, 2024

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- युवतींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण करणाऱ्या अहिल्या मेकओव्हरच्या संचालिका कावेरी कैदके यांनी दुबईमध्ये मेकअपचा मास्टर क्लास यशस्वीरित्या पूर्ण केला. शहरातील युवती व महिलांना अधिक दर्जेदार व अद्यावत प्रशिक्षण देण्याचे काम कैदके यांच्या माध्यमातून होणार आहे.


कावेरी कैदके अहिल्या मेकओव्हर व अहिल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध पार्लरचे प्रशिक्षण घेऊन महिलांना स्वयंरोजगार निर्माण करुन देण्याचे काम करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंदोरच्या स्वयं सिध्दम ग्रुपने कैदके यांची दुबई मध्ये झालेल्या मेकअप मास्टर क्लाससाठी निवड केली.

त्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवून यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना इंटरनॅशनल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मेकअपचा मास्टर क्लासचा इंटरनॅशनल प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *