अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शालेय खेळाडू अभय भाऊसाहेब जगताप याने थर्ड वेस्ट झोनल कराटे चॅम्पियन्स 2023 झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. जगताप याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, तो कराटे चॅम्पियबशिप मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नुकतीच ही स्पर्धा गोवा येथील मनोहर पर्रीकर स्टेडियम मध्ये उत्साहात पार पडली. यामध्ये देशभरातील खेळाडू सहभागी झाले होते. मूळचा नगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा येथील असलेला अभय जगताप हा औरंगाबादच्या टिमकडून राज्यस्तरीय स्पर्धेत उतरला होता. त्याने अतिशय चमकदार कामगिरी करुन सुवर्णपदक पटकाविले. त्याला शितल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
तो इयत्ता तिसरीत शिकत असून, वयाच्या पाचव्या वर्षापासून कराटे खेळत आहे. नियमित सरावाने त्याने विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्याच्या यशात भाऊसाहेब जगताप व अमृता जगताप आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. त्याचे प्रभाकर लोखंडे, रोहिणी लोखंडे, संध्या लोखंडे, प्रमिला लोखंडे, वीरेंद्र लोखंडे, राहूल जगताप, सायली जगताप यांनी अभिनंदन केले.