महायुती सरकारच्या माध्यमातून शहरात विकास कामे मार्गी लावण्याचे कार्य सुरु -अभय आगरकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराला लागून असलेल्या कल्याण रोड परिसर जवळचे उपनगर म्हणून म्हणून ओळखले जात आहे. शहरात महायुती सरकारच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लावण्याचे कार्य सुरु आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. विकास कामांचा आराखडा तयार करून प्रलंबीत कामे मार्गी लावली जाणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले.
कल्याण रोड हॅपीथॉट परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमीपूजनप्रसंगी आगरकर बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून दत्ता गाडळकर यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या या रस्त्याच्या कामाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शीला शिंदे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, विशाल खैरे, बाळासाहेब पाटोळे, विजय गायकवाड, पारुनाथ ढोकळे, भगवानराव काटे, जी.एल. गटणे, अभय शेंडगे, अफसर पठाण, भारत काकडे, अरुण कर्डिले, पांडुरंग कावरे, अरविंद सूर्यवंशी, ह.भ.प. अंबादास नेटके, सतीश गुरव, बाळासाहेब भापकर, पंडितराव हराळ, गोरक्ष गवळी, राजाराम रोहकले, दत्तात्रय कानडे, रोहिदास गीते, सोपान गोरे, सचिन झावरे, सुरेंद्र पवार, अच्युत घुमरे, एल.बी. नागवडे, चंद्रकांत ताकपेरे, अशोक कर्डिले, अंकुश कदम, रामदास दाते, पांडुरंग गोरे, सुरेश तिखे, दिगंबर अहिरे, मुकुंद शहापुरे, संदीप सोनवणे, नवनाथ घुमरे, बाळासाहेब साळवे, हितेश मानकर, संतोष निमसे, शंकर पवार, वैभव ठाणगे, विजय गाडळकर, अमित गटणे, पुष्कर कुलकर्णी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आगरकर म्हणाले की, नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न सुटण्यासाठी दत्ता गाडळकर यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घेतला. कोणत्याही पदावर नसताना नागरिकांना एक विश्वास देवून प्रभागातील प्रश्न सोडविण्याचे कार्य गाडळकर करत असून, विकास कार्यासाठी सुरु असलेली त्यांची धडपड कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. खासेराव शितोळे म्हणाले की, कल्याण रोड परिसराचा विकास कामातून कायापालट होत आहे. सर्वांच्या सहकार्यातून विकासाला गती मिळाली आहे. दत्ता गाडळकर हे कल्याण रोड परिसराच्या विकास कामासाठी नेहमी अग्रेसर राहून योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दत्ता गाडळकर म्हणाले की, कल्याण रोड परिसरात नागरी वसाहती झपाट्याने वाढल्या आहेत. मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे करावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अजून पर्यंत या परिसरामध्ये डांबरीकरणाचे रस्ते झाले नाहीत. पावसाळ्यामध्ये नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याच्या माध्यमातून नागरिकांची सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी महापौर शीलाताई शिंदे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, भगवानराव काटे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. आभार अमोल शिंदे यांनी मानले.
