• Tue. Oct 14th, 2025

न्यायाधीश कृष्णा सोनवणे यांच्या हस्ते पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

ByMirror

Oct 13, 2025

दिल्ली येथील भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप जाहीर झाल्याबद्दल सत्कार


डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे न्यायाधीश सोनवणे यांनी केले कौतुक

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश कृष्णा सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


गावातील नवनाथ विद्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात पै. डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ॲड. सुनील मुंदडा, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. भक्ती शिरसाठ, आशा गोंधळे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धन जनजागृती मोहिमा, वाचनालय चळवळ व वाचन संस्कार अभियान, काव्यसंमेलन व साहित्य संमेलनांचे आयोजन केले आहे. तसेच गावतही काद्याबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी उपक्रमे घेतली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी, यासाठी त्यांनी शाळा आणि गावपातळीवर वाचनालये सुरू केली असून नवोदित कवी, लेखक आणि साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. याच कार्याची दखल घेऊन भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांनी त्यांना भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर केला आहे.


न्यायाधीश कृष्णा सोनवणे यांनी पै.नाना डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. पै. डोंगरे म्हणाले की, निमगाव वाघा ग्रामस्थांच्या पाठबळाने सामाजिक कार्य सुरु आहे. मिळणारा पुरस्कार हा गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *