विधान परिषदेवर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलेल्या निर्णयाचे स्वागत
अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व व न्याय देण्याचे काम केले -साहेबान जहागीरदार
नगर (प्रतिनिधी)- विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारपदी इद्रीस नायकवडी यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. कोठला परिसरात फटाक्यांची आतषबाजी करुन व नागरिकांना पेढे वाटून युवकांनी आनंदोत्सव साजरा केला.

या जल्लोषप्रसंगी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद (भा) कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, उद्योजक हाजी वाहीद हुंडेकरी, सामाजिक कार्यकर्ते मुज्जू भाई, विश्व मानवाधिकारचे प्रदेश अध्यक्ष नवेद शेख, शहाबाज बॉक्सर, अल्ताफ सय्यद, शाहनवाज शेख, अब्दुल रऊफ खोकर, शाहिद अल्ताफ शेख, रबनवाज सुबेदार, तन्वीर पठाण, संजू जहागीरदार, तन्वीर तांबटकर, जीशान शेख, फिरोज शेख, सोहेल जहागिरदार, राझिक शेख, शेरू शेख, माझीन शेख आदी उपस्थित होते.
साहेबान जहागीरदार म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. इतर पक्षांनी फक्त मुस्लिम समाजाला राजकारणापुरते वापरले, मात्र महायुती सरकारमध्ये अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे काम केले. अल्पसंख्याक विकास महामंडळासाठी भरीव निधी उपलब्ध करुन अल्पसंख्याकांच्या विविध विकासात्मक योजना राबविल्या. येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे सर्व समाज पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुस्लिम समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व दिल्याने महायुती सरकारचे यावेळी आभार मानण्यात आले.
