• Tue. Oct 14th, 2025

शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकारी नियुक्तीसाठी शहरात मुलाखती

ByMirror

Sep 20, 2025

युवकांचा उत्स्फूर्त सहभाग


जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी -मयूर मगर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा जनमानसात रुजवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोशल मीडिया विभाग कार्यान्वीत करण्यात आला आहे. या विभागाच्या अहिल्यानगर जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी शिवसेना सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूर मगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सोशल मीडियात कार्य करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.


शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीला शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव, माजी नगरसेवक संभाजी कदम, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, आप्पा नळकांडे, सचिन शिंदे, सुनिल लालबोंद्रे, संजय लालबोंद्रे, अभिषेक भोसले, ओंकार शिंदे, मयुर गायकवाड, स्वप्नील खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रास्ताविक करताना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे म्हणाले की, आजच्या काळात सोशल मीडिया हे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे अत्यंत प्रभावी साधन ठरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सोशल मीडियाचे महत्व अधिक वाढणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात सक्रिय राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.


सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूर मगर यांनी सांगितले की, सोशल मीडियाची ताकद संपूर्ण जगासमोर आहे. अनेक आंदोलने व सत्तांतर सोशल मीडियाच्या जोरावर घडली आहेत. हाच विचार लक्षात घेऊन शिवसेनेचा सोशल मीडिया विभाग सक्षम केला जात आहे. युवकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, अहिल्यानगरमध्ये लवकरच सोशल मीडियासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठीच मुलाखती घेण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमामुळे आगामी काळात शिवसेनेचा सोशल मीडिया विभाग अधिक मजबूत होऊन, पक्षाचे विचार थेट जनतेपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना शहर प्रमुख सचिन जाधव यांनी व्यक्त केली.


बैठकीसाठी दीपक परभाने, अजिनाथ शिरसाट, नामदेव झेंडे, रामदास घुगे, सागर पवार, चैतन्य कोबडे, निलेश शेवाळे, तुषार शेवाळे, अविनाश कर्डिले, रामदास नागरगोजे, अमोल घुटे, सोमनाथ आंधळे, विष्णू घुगे, वैष्णव गलांडे, पवन क्षीरसागर, संदीप मगर, स्वप्नील भरड, विशाल कोळेकर, गौरव पाटोळे, नितीन खेसे, सौरव आळंदीकर, निखिल डोरजकर, आदित्य शेळके, शिवा सोनवणे, योगेश गाडीलकर, सागर गायकवाड, कपिल माने, अजिंक्य तारादरेकर, हेमंत लोखंडे, प्रतीक बोरकर, निखिल ओहोळ, मयूर राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *